शृंगार
नजरेला नजर भिडू दे, श्वास श्वासात मिसळू दे,
अंतरातील काही ओठांना कळू दे....
उमजले तुला जे काही, ते माझ्यात उतरू दे
फुललेल्या या देहातुनी रातराणी दरवळु दे....
तोडून हे पाश सारे, जे दुरावा आणती,
भावनांच्या जलतरंगाने आज आकाश घुसमटू दे.....
-अस्मित