अबोल झाले ओठ जरी भावना अबोल राहत नाहीत
मंगळवार, २६ जुलै, २०११
गुरुवार, २१ जुलै, २०११
परत आलीये....!!!!

काही दिवसापासून सुरू असलेले मेंदूतील वादळ आज अचानकपणे शांत झाल.....
काय चालू होत,कसले एवढे विचार आणि त्यांचा त्रास काहीच समजत किंवा उमजत नव्ह्त...
घंटानाद झाल्यावर चहूकडे जसे तरंग विलोप पावतात आणि शांतता पसरते तसच झालय किंवा मलाच मी नक्की सापडलिये...
हूं...!!! तसच आहे...मला काय हव होत तेच मिळालय...
म्हणूनच हे समाधान अगदी हृदयापासून चेहर्या पर्यंत......
मी परत आलीये....!!!!
पूर्वीची नक्कीच नाही...नवीन जाणीव, नवी उमेद, नवी स्वप्न घेऊन....
पूर्ण होण्यासाठी....तुझ्यासाठी....तुझ्याकडेच!!!!!!
मंगळवार, १९ जुलै, २०११

कधीतरी स्वत:ला या गर्दीतून बाजूला करून त्रयस्थपणे बघाव..
माणसांच्या चेहर्यावरील ते निरनिराळे भाव; काळजीचे, त्रासाचे, प्रेमाचे, रागाचे, बेफिकीरीचे....
प्रत्येक क्षणाला बदलत जाणारे..नवीन अर्थ सांगणारे....
असंख्य माणसांची असंख्य भावविश्वे...
ते घट्ट धरून ठेवलेले हात आणि ती तुटू पाहणारी नाती...
क्षणाक्षणाला बदलणारी माणसे, का सजीव झालेले मुखवटे.....
काहीच कळेणास होत आणि आपलाच चेहरा धूसर होऊन जातो...
शेवटी उरत एक शरीर त्या गर्दीपैकिच एक
त्याला फक्त एकच काम 'बदलत राहण'....अगदी कंटाळा आला तरी....
...............माझ्या कॉफीचा कप आता रिकामा होत चाललाय आणि सभोवतालची गर्दीपण आपापल्या घरी पोहोचलीये..........
शुक्रवार, १ जुलै, २०११
तसेच प्रेमही निभावले असतेस तर...?
कधीतरी या शापित नात्याला अंकुरले असतेस तर....?
कित्येक दिवस घालवले तुझी वाट पाहण्यात
कधीतरी जाणीव पूर्वकसाद घातली असतीस तर...?
नेहमीच असे का होते?
लोहचुंबाकाच्या दोन समान ध्रुवान प्रमाणे आपण वेगळेच राहतो..
आणि दूर गेलो की कोणीतरी एक परत जवळ आकर्षून घेतो......
पण राधा कधी कृष्ण होत नाही.........
आणि मी नेहमी मीरेची जबाबदारी पार पाडत राहते.........
बस्स झाले रे हे आता...!!!
एकदाच... अशी जवळ घे...
कळु देत सार्यांना...तुझ्यात आणि माझ्यातली
अद्वैतता...!!!
-अस्मित
मंगळवार, १३ जुलै, २०१०
गुरुवार, १३ मे, २०१०
रविवार, २ मे, २०१०
पायास माती माझ्या, हे विसरून गेलो...
आज सावरू नका माझ्या मनाला...
धुंदीत "मारवा" मी, माझाच आळवुन गेलो...
प्रत्येक तान माझी, आळवीत मी राहिलो...
प्रत्येक शब्दांमधे मी श्वास भरून राहिलो...
तल्लीनता या मनाची काय सांगू तुला?
प्रत्येक स्वरासोबत मी तुझा होत गेलो...
एक-एक सरगम माझी, मी गीत तुझे झालो...
एक-एक ओळ माझी, मी गझल तुझी झालो...
तू माझी पूर्णता, तूच माझी रिक्तता,
कोणास सांगू कसे, मी पुन्हा जन्माया लागलो
-अस्मित