बुधवार, ३० मे, २०१२


आज पण कोणी आले नाही
आज पण माझा जोड-तानपुरा जुळला नाही.- अस्मित



तुझ्या आठवणीन मधे
स्पर्शाची आस
जसे, चहाच्या कपात
अधर-अमृताचा भास.......



तुझ्या भावनांनी
माझा आसमंत व्यापलेला,
"सोन क्षणांनी"
माझी शब्द कूस उजवलेला -अस्मित



हमे पूरा यकीन था,
आज चाँद जरुर निकलेगा...
आज मेरे मुहोब्बत की बरसी जो थी-अस्मित






थोडस बोलायच होत,
नाही नाही, खूप काही सांगायच होत.
जाईच्या फुलासारख तुझ्यासोबत बहरायच होत. :- अस्मित

"कविता"


कवितेवरची "कविता"
काल मला कविता भेटली
बसली होती फुरंगटून कोपर्‍यात कुठेतरी,
विचारले तिला काय झाले बाई तुला????
डोळ्यात पाणी आणून, थोडस रागवून
म्हणाली, "आणखी किती भावनांच ओझ बाळगू मी?"
"माझ्या भावना जाणून घेणार का कधी??"

हे ऐकून मीही विचारात पडले, म्हणाले कवितेला "खरच माझे चुकले."

माझ्या भावना व्यक्त करायला, शब्द शब्द जोडले,
त्यावर स्वल्पविराम, पुर्णविरामांची बंधने लादली..
"तुला" जन्माला घातले..
त्याच बंधनांचा आज तुला त्रास होतोय...

तू जन्माला आलीस की सगळे लोक तुला "त्यांचीच" समजायचे..
"किती छान", "वा वा", "अप्रतीम" या आणि अश्या अनेक शब्दांनी तुझी स्तुती करायचे...
पण ती स्तुती ही पुन्हा "शब्दंच" ना?


तू मुक्त,
तू स्वछंदी,
तू अपार,
तू निराकार,
आणि मी वेडी तुला बांधून ठेवायचा प्रयत्न करत होते...
आणि कविता " हसली..."
कारण.....?????? अस्मित


गले नही लगाओगे?????


जिंदगी मिली थी कल मुझको, मायूस पड़ी थी किनारे के पास
मुझे रोक के बोली " ज़रा ठेहरो. कुछ बातें सुनो मेरी".
मौत से तुम रोज रूबरू होते हो कभी मुझसे भी आके मिलो.
बचपन में मिला करते थे घंटो खेला करते थे,
बचपन बीत गया और हमारा साथ कम होता गया.
कभीकभी अपने गीतोंमें अपनी नज्मोंमें ढूंडते थे मुझे,
लेकिन अपने गले नही लगाया फिरभी.
अब मेरे जाने वक़्त आया हैं एक बार जाने से पहले गले नही लगाओगे????? अस्मित