बुधवार, ३० मे, २०१२


जन्म आणि मृत्यू, खेळ सारे खेळले.......
सरणावर असताना, जगण्याचे राग आळवले...!!
-अस्मित.

मीटिंग बाय द रिवर.


वाट पाहिली तुझी कोजागीरीच्या राती
जिथे नदीकिनारी सावल्यांचे हात हाती
वसाविला होता जिथे वचनांचा गाव
नजरांचे खेळ घेत अंतरीचा ठाव

       तू नाहिसच आली
       सांजसांध्येने साथ दिली
       उघडून कवाडे मनाची
       गुपितांनी तिची ओंजळ भरली

तिच्या गालांच्या रक्तिमाने तेव्हां सृष्टी सारी रंगली होती
कातरवेळ पण सूर्याच्या बाहूपाशात विरली होती
मीही फिरलो मागे अडवून अश्रूंचे कढ
म्हणालो " हे तर खुळे स्वप्न, इथे आत्म्याशिवाय सोबत कोण?"

:- अस्मित


[या कवितेचा नाव इंग्लीश असण्याचे कारण,
काल सकाळी ज़ी टीवी वरील "आइडिया जलसा" कार्यक्रमामधे
पंडित विश्वमोहन भट यांचे मोहन-वीणा वादन होते, त्यात त्यांनी "अ मीटिंग बाइ द रिवर" -कूडर आणि विश्वामोहन भट्ट या आल्बम मधील एक धून पेश केली होती.
कवितेला हे नाव समर्पक वाटले म्हणून.............
अश्याप्रकारे माझा बॅंगलुर मधील शेवटचा रविवार मस्त गेला.]






प्रत्येक हृदयाची एक कहाणी...आपल्यासारखीच
प्रत्येक ओठांवर तीच गाणी...आपल्यासारखीच
प्रत्येक नजर तेच बोलणारी...आपल्यासारखीच
प्रत्येक भाषा तेच सांगणारी...आपल्यासारखीच
- अस्मित

मृत्यू भेटला मला
विचारले कंटाळा कसा येत नाही तुला?
म्हणाला मी तर रोज आयुष्य मागतो
तूच जवळ घेत नाही मला- अस्मित



काल रातराणी उमलली माझ्या मनात
तुझ्या श्‍वासात चुकून माझे नाव आले होते का? - अस्मित





बस झाले तुला सारखे सारखे आठवने,
जिवंत असूनसुद्धा, गेल्या सारखे वागणे,
पुन्हा बेधुंद होणार मी
पुन्हा प्रेमात जगणार मी

बस झाली ती तारखा, वेळा आणि जागांची उजळणी
कातरवेळी वाहणारे डोळ्यातले पाणी,
पुन्हा विश्वास ठेवणार मी
पुन्हा प्रेमात जगणार मी
- अस्मित

आज पण कोणी आले नाही
आज पण माझा जोड-तानपुरा जुळला नाही.- अस्मित