बुधवार, ३० मे, २०१२
मनांतून आमच्या जात नाही 'जात'
मुलींच्या आमच्या करतो आम्हीच घात
पोरींची छेड काढतो
'कुलदीपक' आमचा बहाद्दर
मुलीना पोटातच मारू
तुरुंगात गेलो तरी बेहत्तर
मुलीने जातीबाहेर लग्न केलं
बापा'तला 'पुरुष' दुखावला
पोटच्या पोरीवर बलात्कार करून
त्यांचा अहंकार सुखावला
मुलगी मेली तरी चालेल
'जात' मात्र जाऊ नये
पुरुष पुरुषांशी लग्न करतील
पण बायका सुखी होता कामा नये
मनांतून आमच्या जात नाही 'जात'
मुलींच्या आमच्या करतो आम्हीच घात
--------------------------
कसे जन्मलो / कसे परत चाललो /
दैवाच्या हातचे प्यादे बनून राहिलो//
न मागितले देणे / न कधी नवस फेडले /
देवळाच्या दारी बाजार भावनांचा चाले //
देवा तुझी हि करणी / मना शाश्वत न केले /
कमळाच्या पाकळ्यात भ्रमरा घर कि हो दिले //
दरवेळी हेच घडे / मुका प्राणही गमावे /
अबीर गुलालाने येथे मळवट भरलेले //
मी पाही साऱ्याकडे / असा तिह्राइतपने /
माझ्याच लेखणीत चंद्रप्रकाशाचे सडे //
******************
सौजन्य :-
छायाचित्र : श्री.अमोल लोखंडे सर
छायाचित्रातील व्यक्ती : श्री.सुहास नाडगौडाजी
कवियत्री : अस्मित
माझ्या आजीच घर
माझ्या आजीच घर दोन माड्यांच,
बालपणाने जिथं जीवन अनुभवायच.
माझ्या आजीची तुळस रामप्रहरी नटलेली
दिवा उदबत्तीने तिची नजर उतरवलेली.
माझ्या आजीच्या गळ्यात कोकीळ वसलेला
साखरझोपेतून मग श्रीरंग उठलेला
माझ्या आजीचा पहिला घास गाईला
अमृताची चव तीच्या दूध तूप सायीला
माझ्या आजीच्या गवळणी दिवाळी पाडव्याला सजलेल्या
गोवर्धन उभा, पेँद्या मात्र नीजलेलाच
माझ्या आजीच्या गोधडीत आठवणी विणलेल्या
अहेवपण देऊन माझ बालपण हिरावून गेलेल्या
-अस्मित
बालपणाने जिथं जीवन अनुभवायच.
माझ्या आजीची तुळस रामप्रहरी नटलेली
दिवा उदबत्तीने तिची नजर उतरवलेली.
माझ्या आजीच्या गळ्यात कोकीळ वसलेला
साखरझोपेतून मग श्रीरंग उठलेला
माझ्या आजीचा पहिला घास गाईला
अमृताची चव तीच्या दूध तूप सायीला
माझ्या आजीच्या गवळणी दिवाळी पाडव्याला सजलेल्या
गोवर्धन उभा, पेँद्या मात्र नीजलेलाच
माझ्या आजीच्या गोधडीत आठवणी विणलेल्या
अहेवपण देऊन माझ बालपण हिरावून गेलेल्या
-अस्मित
I am in LOVE
आम्ही रोज भेटतो...
न चुकता एकमेकांशी गुजगोष्टी करतो.
प्रत्येकवेळेस काही सांगायचे असतेच असे नाही,
कदाचित जाणून घ्यायचे असते त्याच्याबद्दल बरेच काही...
कामात असला की तो हळूच ढगाआड लपतो
मी मात्र वाट पाहत समुद्रकिनारा गाठलेला असतो....
उचलून घेतो मग तो परत त्याच आवेगाने समुद्राला
त्याच्या उशिरा येण्याची सगळी कारणे मग खरीच वाटतात मनाला....
त्याच्या अमावस्येसारखा मलाही शाप अबोल्याचा
सोडून जाईल कुठे तो...???? त्याला उ:शाप शीतलतेचा......
अजूनही समजले नाही, त्याच शांत विचारी रूप खर की आवेगाने उत्कट होण....????
माझे पाय सदैव जमिनीवर
त्याच पूर्वेला मावळन...............
:- अस्मित
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)






