शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

मीरा-मेघ-मी......

नेहमीच बरसत राहीले त्या एका रंगा साठी.....

तो मात्र अडकूनी राहिला राधा आणि रूक्मिणी साठी

मीरेचे विष भिनले त्याच्या कंठात....

सूर वाजत राहीले फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी

मेघ बनुनि शोध घेतला सागरतळि...

त्याने विरह चेतवत ठेवला क्षणोक्षणि...

ना सोडले एकटे कधी या अधुर्‍या मैफीलीत तरी.....

समोर असूनी अंतर राखले नंतर लाज बाळगण्यापरी....अस्मित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: