पाण्यातील एक नाव, शोधीत किनारा एक गाव,
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...
गवसावा किनारा, कुणीतरी माझा,
एक नाविक अन् पसारा समुद्राचा
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...1
तो चंद्र ही आज फितूर जाहला, लपवुनी चांदणे गावी निजला
वार्याचे ते चरण स्पर्शुनि घेत असे ती धाव
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...2
ऋतू चक्राचे आवर्तन संपले, शोध घेऊनी श्वासही मिटले
काळोखाच्या डोहाने या नवा मांडला डाव
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...3
पाण्यातील या तप्तपदिला नावही मग सरासवून गेली
उधळून टाकिले सर्वस्व तिने झेलीत चांदण घाव
कुठे दिसेना ठाव, हरवला डोळ्यातील भाव...4
:- aASmit
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा