अर्धा श्वास तुझा, त्यात अर्धा माझा होता... रात्र होती अर्धी-अर्धी, सोबतीला चंद्र अर्धा होता... अर्धी उमललेली रात-राणी, अर्धी फुललेली गात्रं.. स्वप्न चंदेरी घेऊन आली, चमचमती तारकांची रात्र.. अर्धा वेडेपणा तुझा, त्यात अर्धा माझा होता.. अर्ध्या अर्ध्या कवितेचा इथेच अर्धा अंत होता.. -अस्मित |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा