माझी जपान सफर - १०
आधी एकदा जाऊन पाहिलं असले तरी या शनिवारी मैत्रिणी साठी परत टोकियोला जाणे झाले.या वेळेस जाताना आम्हाला मस्त चित्रांनी सजवलेल्या रेल्वेने जाता आले.टिव्हीवर भेटणारे सगळे कार्टून मित्र या रेल्वेच्या भिंतीवर रंगविण्यात आले होते.खरे म्हणजे ती रेल्वे "तोत्तोचान"ची रेल्वे वाटत होती अगदी... :)
टोकियोला गेल्यावर आम्ही पायी न फिरता टोकियो दर्शन च्या बसने जायचे निश्चित केले.स्काय बस कंपनीच्या ओपन बस मधून फिरताना एकदम यश राज टाईप सिनेमामध्ये असल्यासारखे वाटत होते. :)
त्या बस ला १८०० येन भाडे होते आणि कुठेही उतरा आणि चढा असा १ दिवसाचा तो पास होता.बस मधून हिंडताना मस्त टोकियो शहर आणि त्याच्या इतिहासाचे, दर्शन आणि ज्ञान मिळाले.
टोकियो रेल्वे स्थानकाबाहेरच एक मजेशीर टॅक्सी दिसली.तिला पाहून आपल्याकडील २ बिघा जमीन आठवला. पण हि टॅक्सी त्याची सुधारित आवृत्ती होती.या ओपेन टॅक्सीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला थंडी वाजू नये म्हणून
ब्लॅंकेटची व्यवस्था करण्यात आली होती (आता एवढे करण्यापेक्षा आधी "बंद टॅक्सी" का वापरली नाही असला फालतू प्रश्न विचारू नका मला...कारण टॅक्सी आणि टॅक्सी ड्राइवर या दोघांशी मला काही घेणदेण नाही).
बागा, शॉपिंग मॉल,५ तारांकित हॉटेल,रस्त्यातून जाणारे मोर्चे असे विविध गोष्टींचे दर्शन घेत आणि त्याबद्दलची सगळी माहिती ऐकत आम्ही एकदाचे टोकियो टॉवरला पोहचलो.भूकंप प्रणव देशतील या उंच उंच इमारती ते सुद्धा कॉंक्रीटचा कमीतकमी वापर करून बांधलेल्या, हे सर्व पाहून त्यांच्या ज्ञानाचे कौतुक वाटते.
टोकियो टॉवर बद्दल आधीच्या लेखात (माझी जपान सफर - ५) माहिती दिलेली असल्यामुळे इथे परत काही लिहित नाही. या वेळेस काही नवीन गोष्टी नजरेस पडल्या त्या म्हणजे टोकियो टॉवर बांधतानाचे अगदी जागा निवडणे, ड्रॉईंग-प्लॅन तयार करणे, त्या काळातील वाहतूक व्यवस्था इ.इ. सगळ्या गोष्टींचे माहितीसहित फोटो, जगातील सर्वात मोठ्या "स्काय ट्री" चे टोकियो टॉवरवरून दर्शन आणि टोकियो टॉवर रात्री पाहण्याचे सुख.काय अवर्णनीय अनुभव.....अहाहा...!(तोंडातून हा शब्द बाहेर पडलाच पाहिजे.....)
येथे काचेचे एक मोठे हृदय (वॉर्म हार्ट) ठेवण्यात आले होते आणि त्या हृदयाच्या आत टोकियो टॉवरची लहान प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती.हे हृदय १९५८ पासून वापरात आहे.जपान मध्ये आता पासूनच ख्रिसमसची तयारी चालू आहे. त्यासाठी सगळीकडे विविध प्रकारे सजविण्यात आलेले आहे.टॉवरच्या आवारात मस्त ख्रिसमसचे झाड, खोट्या बर्फाचा पाऊस, नाच-गाणे, चालू होते.टॉवर वरून शरदऋतूतील झाडाच्या रंगबदलाचे मोठे सुंदर दृश्य दिसत होते.
टॉवर आधीच पाहिलेला असल्याने माझे लक्ष जपानी लोकांचे निरीक्षण करण्याकडे होते. टॉवर मध्ये जेवण करत असताना आमच्या शेजारील टेबलवर एक विचित्र केशकर्तन आणि रंग मारलेला एक मुलगा आला आणि त्याच्या त्या अवतारामुळे मला आणि माझ्या मैत्रिणीला अक्षरश: उलटी होईल असे वाटत होते. इतके घाण हिरवे लाल रंग आणि सरड्या सारखी केसरचना पाहून डायनासोरच्या युगातील एक प्राणी चुकून येथेच राहिला असे वाटू लागले.दुसऱ्या एका टेबलवर २ मुली नुसतीच जागा अडवून मोबाईलवर गेम खेळत बसल्या होत्या.एक जण जेवण करून वामकुक्षी घेत होता.तिथे फिरत असताना चेन्नईचा एक घोळका आमच्या समोर आला आणि जपान मध्ये भारतीय भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला. मी मनात म्हणाले आमच्या कंपनीत या सगळी तमिळ भावंडे भेटतील.अगदी कडकडून भेटा...त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी आम्हा दोघींना एक-एक बिस्किट्स चा पुडा दिला (तो बिस्किट्सचा पुडा टॉवर मध्ये ख्रिसमस आणि जाहिरात व्हावी म्हणून फुकट देत होते...तरी देखील त्यांचा उदार मन मला भावले.कारण काही लोक ते पण देणार नाहीत दुसर्यांना...असो)
टॉवर मध्ये खरेदी करून झाल्यावर बाहेर आलो तर संध्याकाळचे ५ वाजले होते आणि अंधार पडून थंडी वाढली होती.बस साठी वाट असताना मागे वळून टॉवर कडे पहिले आणि डोळेच दिपले...पहिल्यांदा पाहिलेला टॉवर हाच का असा प्रश्न पडला...कारण आधी पाहिलेला टॉवर दिवसा उजेडी होता आणि आत्ता काळ्या आकाशाच्या कॅनव्हास पेपरवर दिसणारा प्रकाशमय टॉवर-एकदम हंड्सम....स्वतःची ओळख दाखवून देणारा...टॉवचे फोटो घेत असताना मधेच सगळ्या लाईटस पूर्ण घालवल्या आणि हळूहळू एक-एक करत टॉवर वरचे मंद आणि वेगवेगळ्या रंगांचे दिवे प्रज्वलित करण्यात आले.काय अनुभव होता तो....आपल्याकडे दिवाळी पहाट ला सकाळी धुक्यात आणि मस्त गारठ्यात जश्या पणत्या लावून तळ्यातील गणपती सजवलेला असतो अगदी तसाच अनुभव.माझी दिवाळी तर इथेच सुरु झाली.आणि माझ्याहि नकळत मी टॉवरलाच "आय लव यू " म्हणाले (कोण म्हणाले रे "आरेरे...दुर्दैव आमचे...!!!)
परत जाताना जायंट व्हील, आसाही वर्तमानपत्र व शिंनीतेत्सू कंपनीच्या इमारती (या शिंनीतेत्सू कंपनीने आम्हाला Oracle मध्ये असताना सारखे काम पाठवून खूप छळले होते ) पाहिल्या आणि टॉवरप्रेम मनात ठेऊन घरी परतलो...
........................................अस्मित (०९ नोव्हें. २०१२ जपान)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा