माझी जपान सफर -११
नमस्कार मित्रहो, म्हणजे मैत्रिणी पण......
बोला...कसे आहात सगळे जण?
मी मस्त सुखात आहे.
कामाचा व्याप आणि लोकांचा त्रास दोन्ही एकदमच वाढल्याने माझे लिहिण्याकडे काही दिवस दुर्लक्ष झाले.
तसेही रोज उठून लिहलेच पाहिजे असा काही नियम नाही.....चांगला असत अधेमधे थोड थांबून स्वतःच्या आणि इतरांच्या साहित्याचा आस्वाद घेतलेलं....नाही का?
तर आज आपण योकोहामा शहरातील हाक्केजिमा मध्ये असणाऱ्या "सी पॅरडाइस"च्या सफारीला जाऊ.......अहो थांबा जरा....जेवणाची पिशवी सोबत घेऊ सोबत. ते आधी महत्वाचे...बाकी सगळे नंतर.
तर नेहमी प्रमाणे मी आणि माझी मैत्रीण ४ वेगवेगळ्या ट्रेन ने प्रवास करत एकदाचे पोहोचलो.
हाक्केजिमा हे एक मानवनिर्मित बंदर आहे.येथे ३ मोठी मत्स्यसंग्रहालये आहेत.५०० वेगवेगळ्या जाती आणि समुद्रातील १००००० प्राणी आहेत. बेटावर बर्फाचे घर, अम्यूज़्मेंट पार्क, हॉटेल्स, शॉपिंग मॉल आहेत.
मत्स्यसंग्रहालय+डॉल्फिन शो+फुरेई लगून या ३ गोष्टी पाहायला २७०० येन असा खर्च येतो. निसर्गाकडे असणारा आणि समुद्राच्या पोटात दडवलेला तो खजिना खरेच एक अद्भुत नगरीत आल्याचा अनुभव देतो. आपल्या कल्पनेपलीकडील ते सुंदर प्राणी, त्यांच्या चपळ हालचाली एकदम थक्क करून सोडणारे आहे. फाइंडिंग नीमो या सिनेमा मध्ये दाखवलेले सगळे प्राणी खरे अस्तित्वात आहेत हे पाहून सिनेमा बनविणाऱ्या लोकांना, त्यांच्या अभ्यासू वृत्तीला मनातल्या मनात सलाम केला.निमोला भेटल्याचा आनंद तर झालाच, सोबत ती मोठाली कासवे पण अद्भुत होती.स्टिंग रे,स्टार फिश,पाणघोडे इतके असंख्य प्रकार आहेत कि काय पाहू, काय नको होऊ गेल होत. जेली फिशचे वर्णन करणेच अवघड. कुठे तोंड, कशी शरीर रचना काही कळत नाही. मस्त मऊ लुसलुशीत काहीतरी पाण्यात हिंडत आहे असे वाटते. त्यात सुद्धा बरेच प्रकार, एक पांढरा, तर दुसरा गुलाबी, काहींना सगळीकडे लाईट तर काही नुसतेच माथ्यावर सूर्यबिंदू घेऊन मिरवत असलेले.
काही माशांचे रंग तर असे होते कि नीट पहिल्याशिवाय कळणारच नाही, कि मासा आहे कि दगड.
फुग्या सारख तोंड असणारे, फुग्याचे शरीर असणारे, तर काही साळी सारखे अंगावर काटे असणारे मासे , पोलर बेअर, पेंग्विन, पांढरे स्टार फिशसगळेच मस्त मस्त मस्त....३-४ फुट मोठे खेकडे पाहून तर विश्वासच बसेना असेही काही असते म्हणून....
एका माशांच्या प्रकारामध्ये हे मासे झुंडीने राहताना पाहिले. झुंड तरी किती मोठा...तर एक मोठी खोली भरून जाईल असा. एकदम आत छोटे मासे स्वतःला सुरक्षित ठेवतात, त्या बाहेरील थोडे मोठे मासे अन्न शोधतात आणि त्यापेक्षा मोठे मासे राज्यकर्ते असतात. समुद्रातील सगळा कारभार ते सांभाळतात. त्यांचे ते झुंड पाहून चंदेरी चादर समुद्रात लखलख फिरताना भासते.
वालरूस नावाचा एक समुद्र प्राणी म्हणजे हत्तीचा छोटा भाऊ वाटतो. मोठे दात आणि ढोलू शरीर सांभाळत पाण्यात मस्त कसरती करत असतो.यथे एक इतका छोटा मासा होता कि त्याला भिंगातून पाहावे लागते आणि त्याचे शरीर म्हणजे नुसता एक लाल दिवा वाटत होता, बाकी काही जाणवत नव्हते कि तो मासा असेल म्हणून.येथे समुद्रातील कोरल्स जशीच्या तशी आणून ठेवली आहेत. त्यांचे ते सुंदर रंग मन प्रफुल्लीत करून जातात.
येथून बाहेर पडल्यावर डॉल्फिन चा शो पाहायला जाता येते. येथील सील मासा एखाद्या उत्तम निष्णात डॉक्टर प्रमाणे पाण्यात बुडत असणाऱ्या माणसाला बाहेर काढून, त्याच्या पोटातील पाणी काढून टाकून, त्याला तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन बरे करत होता. डॉल्फिन बद्दल तर आपल्याला माहीतच आहे कि ते माणसाची किती हुबेहूब नक्कल करू शकतात. ते चक्क माणसासारखे हसतात देखील.शिकण्याची इच्छा आणि शिक्षक दोन्ही चांगले असेल तर काय धमाल करता येते ते अनुभवले.
पुढे फुरेई लगून ला गेलो कि त्या ठिकाणी आपल्याला पेंग्विन, डॉल्फिन यांच्या सोबत खेळता येते.फोटो काढता येतात, त्यांना जेवण भरवता येते. तेथे जाण्याआधी काळजी घेण्यासाठी माहिती सांगितली जाते:
1.सर्व प्रथम प्राण्यांना हात लावण्याआधी आणि नंतर हात साबणाने धुणे.
2.डॉल्फिन ला चेहऱ्याला हात लावणे, डोक्यावर थोपटणे, शेपटीला हात लावणे असे आवडत नाही. डॉल्फिन लगेच चावतो अथवा शेपटीने तडाखा देतो.
3.मासे पकडताना पायाची काळजी घ्या, एखादा मासा दगड समजून पाय ठेवाल आणि मासा पायाला चावेल इ. इ.
या डॉल्फिन सोबत खेळताना खूप मजा येते. त्यांना आधी १-२ मासे खायला घालायचे आणि मग त्यांच्या पाठीवर, पोटावर हात फिरवायचा. काही लोक तर त्यांच्या दातांना, जिभेला हात लावत होते. अर्थात हे सगळे निष्णात मार्गदर्शक सोबत असताना करू शकत होतो. पांढरे डॉल्फिन तोंडात पाणी घेऊन ते आपल्या अंगावर उडवायचे आणि मग मोठ्याने हसायचे.
येथील अम्यूज़्मेंट पार्क मध्ये ब्लू फॉल म्हणून एक खेळ होता. १०४ मी उंच नेऊन तुम्हाला जोरात खाली सोडले जायचे आणि जमिनीच्या जवळ आल्यावर मधेच थांबवायचे. खूपच रोमहर्षक असा खेळ होता तो. दुसरीकडे पाण्यातून चालणारे रोलर कोस्टर, स्काय सायकलिंग, मेरी गो राउंड वगैरे सारख्या गोष्टी होत्या.
समुद्रातील प्राण्यांचे असंख्य निरनिराळे खाद्य पदार्थ म्हणजे खवय्या लोकांसाठी पर्वणीच आहे.
बास आज एवढंच.
उद्या मी हाकोनेला जाणार आहे. तिकडचा जपान अनुभवून येते....आल्यावर भेटूच.....
........................................अस्मित (०३० नोव्हें. २०१२ जपान)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा