गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२







समुद्र ................१

परवा तुझ्या किनार्‍या जवळून जाताना कससंच झालं...
कारण नाही समजले......कदाचिद समजून घ्यावेस नाही वाटले.
तू एवढा अथांग पसरलेला निळा रंग त्या थंडीने पार काळवटून टाकला होता.....

एकही बोट तुझ्या रंगात तरंगत नव्हती....कि एखादे धीट चिटपाखरू तुझ्याजवळ येत नव्हते.
ते तुझे असह्य्यपण होते कि माझे......
कधी नव्हे ते मला तुझ्या जवळ यावेसे वाटले नाही...तुझ्या पाण्याला स्पर्श करावा वाटला नाही....
त्या थंड पाण्याचा स्पर्श आठवला तरी मृत्युची एक लहर जाते शरीरातून....
आणि झोकून द्यावेसे वाटते स्वताला त्या डोहात.....शांत थंड जीवन.........
आता बरसू नकोस पाऊस होऊन असा....

......................................................अस्मित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: