रविवार, ९ डिसेंबर, २०१२






समुद्र.............................३

कंदिलाच्या काचेसारख झालंय........
मिणमिणत का होईना वात जळत राहते रात्रभर.........आधार घेत.

खरचं आधार कोण कोणाला देत असत?
उगाच घाबरलेल्या मनाला उजेडाचा आधार कि,
वाऱ्यावर फडफडणाऱ्या ज्योतीला काचेचा आधार....???
वात जळत रहाते अखंड, तिला आधार असलेल्या काचेवर काजळी धरत......
अनामिक भीती घर करून राहते मनाचा अंधार वाढवत.
काचेवरील काजळी रांगोळीने स्वच्छ होते न...अगदी तसेच मनाचे झाले पाहिजे.....
पण हा हा, हा..समुद्र आहे ना, रोज त्याच्या त्या आवाजाने घाबरवत राहतो मला.....अखंड.
आपल्या अजानबाहू मध्ये मला सामावून घ्यायला पाहतोय तो......मी ऊरफुटेस्तोवर राहते मनातून.....

त्याचा तो आवाज...घोंगावणारा.......गंभीर...... मला भीती वाटते......


रांगोळी संपलीये...........

....................................................................अस्मित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: