शनिवार, २२ डिसेंबर, २०१२
मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२
समुद्र................७
तू फक्त माझा सखा....
माझ्या जन्मापासून सगळ्या क्षणात साथ देणारा.......
माझे पहिले पाऊल तुझ्याच दिशेने....
खूप आवडायचास मला...आवडतोस......अजूनही.......................
मैत्री आपली कित्ती घट्ट ......
तुला आठवतंय......पहिल्यांदा तुझ्या पाण्यात शिरले........किती खारट केले होतेस मला.....
पण त्या खारटपणातील प्रेम जाणवायचे.....जाणवते......अजूनही.......
कित्ती सुंदर रंग, जीव आहे तुझ्या पोटात.....कुठून निर्माण करतोस हे जग...???
एकदम अवर्णनीय.........आपलेसे.....
मला आठवतंय...आई सांगायची..........बाहेरून आल कि पाण्याने पाय का धुवायचे ते.....
कित्येकांची पापे तू स्वतःच्या पोटात सामावून घेतलीस......
खरच कसे जमते तुला....पवित्र राहायला.......
काल गप्पा मारताना म्हणालास.....कि मी अनाकलनीय आहे......
मला समजून घेणारा तेवढाच समजूतदार असायला हवा............
पण तुझ्याशिवाय..........
माझ्या भावना तुझ्या समोर मांडताना तुला बरोब्बर कळते माझे मन..............
मग तू एवढा निरंकार माझ्या जवळ असताना, आणखीन कोणी...............
तुझ्या डोळ्यातील समुद्र नेहमीच माझी साथ देतो.....तुझा प्रत्येक शब्द माझ्यासाठी धर्म असतो................
एक निर्गुण..............तू
....................................................................अस्मित
(माझी साता समुद्राची कहाणी..............सुफळ संपूर्ण)
रविवार, १६ डिसेंबर, २०१२
समुद्र ................६
तुझी मनातून होणारी घालमेल...समजतेय.....
कित्येक वर्षांचा त्रास....किती शांतपणे सहन केलास तू.....
आता इतके वर्षांनी तू घेतलेला तांडव अवतार....सगळ, काही क्षणातच शांत करणारा....
तुझ्या मनातील घुसमट अजस्त्र रूप धारण करून सर्व भूतलावर पसरवून शांत झालेला तू......
अगदी निरागस सौंदर्य......
तुझ्यातील जीवांचा माणसाने केलेला अंत, तुला ओरबाडलेल्या खुणा....सगळकाही परतवून टाकलेस.
तुझा राग नाही येत....वाईट वाटत राहते फक्त.....तुझ्या साठी काही करू न शकल्याचे.....
तुला ओरबाडण्यात आपणही सामील होतो...आहोत याचे.......
माफ करशील...........?
.......................................सर्वांना?
..........................
शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२
समुद्र..................५
ही ही ही ही........
अरे बास...
किती छळशील.....
बघ परत मोडलंस ना....
तुला कंटाळा नाही येत.....
घर मोडण्याचा....
घरात थोड पाणी दाखवावे म्हणून तुला आत येण्याची परवानगी देते, तर तुझ आपलं नेहमी सारखच...
मोडण.......
स्वतःच्या पोटात एवढ सगळं ठेवतोस, आणि जरा कुठे तुला लहान करून दुसऱ्याच्या दारात जागा देऊ केली तर तुझ लगेच उधळवून टाकण...
कधीतरी तळ्यासारखा होऊन पहा...........
गोड पाणी ,छोटासाच............
चिखलात कमळ फुलवणे काय असत ते कळेल तुला.................
नाहीतर मला घेऊन जा न,....आत...गर्द निळ्या रंगात....................
म्हणजे माझ घर कधीच मोडणार नाही.................
तुलाही ते जमणार नाही....
हा हा हा.........अरे बास..........
माझ घर मी स्वतःच मोडलं........
.............................. .............................. .............अस्मित
किती छळशील.....
बघ परत मोडलंस ना....
तुला कंटाळा नाही येत.....
घर मोडण्याचा....
घरात थोड पाणी दाखवावे म्हणून तुला आत येण्याची परवानगी देते, तर तुझ आपलं नेहमी सारखच...
मोडण.......
स्वतःच्या पोटात एवढ सगळं ठेवतोस, आणि जरा कुठे तुला लहान करून दुसऱ्याच्या दारात जागा देऊ केली तर तुझ लगेच उधळवून टाकण...
कधीतरी तळ्यासारखा होऊन पहा...........
गोड पाणी ,छोटासाच............
चिखलात कमळ फुलवणे काय असत ते कळेल तुला.................
नाहीतर मला घेऊन जा न,....आत...गर्द निळ्या रंगात....................
म्हणजे माझ घर कधीच मोडणार नाही.................
तुलाही ते जमणार नाही....
हा हा हा.........अरे बास..........
माझ घर मी स्वतःच मोडलं........
..............................
सोमवार, १० डिसेंबर, २०१२
समुद्र..................४
पहाटेच्या वेळी किती सुंदर दिसतोस तू......
एक सुंदर आलाप......................
"दिवा कशाला आणलाय??".........
अरे तुझ्या सारखा हा पण माझा......आपला "हबीब".........
अनंता पर्यंत................
तुम्ही मला खूप शिकविले, मला घडविले.......
जबाबदाऱ्या सांभाळणे तुमच्यामुळे समजले......
अरे कशा म्हणून काय विचारतोस.....
तुला तुझ्या पोटातील जीवनाची काळजी घेण्याची....
याला त्याच्या वातीला सांभाळण्याची,अगदी स्वतःचा देह जाळून......
तुम्हीच तर शिकविता जीवन कसे मुक्त होऊन जगायचे,परंतु आपल्यातील जीवांना धक्का न देता....
दुसर्यांची भीती, पाप सगळ दूर करायचं पण त्याचा गवगवा नाही करायचा....
तुझ्या निळ्याशार डोळ्यातून जाणवणारे प्रेम आणि विश्वास...... अथांग.....
याची उबदार सोबत कुठेही वाट न अडवणारी...........अविरत
म्हणून तर मी आलेय इथे.............. आपल्या तिघांचे विश्व................
अमर्यादित.........
सुखाची सरगम..........................
.........................................................................अस्मित
रविवार, ९ डिसेंबर, २०१२
समुद्र....................
कंदिलाच्या काचेसारख झालंय........
मिणमिणत का होईना वात जळत राहते रात्रभर.........आधार घेत.
खरचं आधार कोण कोणाला देत असत?
उगाच घाबरलेल्या मनाला उजेडाचा आधार कि,
वाऱ्यावर फडफडणाऱ्या ज्योतीला काचेचा आधार....???
वात जळत रहाते अखंड, तिला आधार असलेल्या काचेवर काजळी धरत......
अनामिक भीती घर करून राहते मनाचा अंधार वाढवत.
काचेवरील काजळी रांगोळीने स्वच्छ होते न...अगदी तसेच मनाचे झाले पाहिजे.....
पण हा हा, हा..समुद्र आहे ना, रोज त्याच्या त्या आवाजाने घाबरवत राहतो मला.....अखंड.
आपल्या अजानबाहू मध्ये मला सामावून घ्यायला पाहतोय तो......मी ऊरफुटेस्तोवर राहते मनातून.....
त्याचा तो आवाज...घोंगावणारा.......गं भीर...... मला भीती वाटते......
रांगोळी संपलीये...........
.......................... .......................... ................अस्मित
उगाच घाबरलेल्या मनाला उजेडाचा आधार कि,
वाऱ्यावर फडफडणाऱ्या ज्योतीला काचेचा आधार....???
वात जळत रहाते अखंड, तिला आधार असलेल्या काचेवर काजळी धरत......
अनामिक भीती घर करून राहते मनाचा अंधार वाढवत.
काचेवरील काजळी रांगोळीने स्वच्छ होते न...अगदी तसेच मनाचे झाले पाहिजे.....
पण हा हा, हा..समुद्र आहे ना, रोज त्याच्या त्या आवाजाने घाबरवत राहतो मला.....अखंड.
आपल्या अजानबाहू मध्ये मला सामावून घ्यायला पाहतोय तो......मी ऊरफुटेस्तोवर राहते मनातून.....
त्याचा तो आवाज...घोंगावणारा.......गं
रांगोळी संपलीये...........
..........................
गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२
समुद्र.....................२
समुद्रावर जायचं ??.........
होडीत बसून एकटक समुद्राकडे पाहत राहू.
बिनधास्त लाटा आणि तुझ्या आठवणी, एकत्र........मनाच्या रंगपटावर नर्तन करीत राहतात.
समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात तुझ्या सोबतचे सारे क्षण स्पर्शत राहत
ात...
तुला नक्की काय झाले होते?... असे अचानक.....
तुझी ती कणखर प्रतिमा.....??
फुटलेल्या जहाज सारखे झाले होते तुझे......
मनासकट सगळे वाहून गेले होते तळाशी, वर उरला होता फक्त आर्त समुद्र....नासलेला....
मला तो समुद्र वाचवायचा आहे....त्याच्या अंतरंगातून तुला ओळखायचे आहे.....
सापडशील ना......भेटशील ना......
आई..............?

......................................................अस्मित
समुद्र ................१
परवा तुझ्या किनार्या जवळून जाताना कससंच झालं...
कारण नाही समजले......कदाचिद समजून घ्यावेस नाही वाटले.
तू एवढा अथांग पसरलेला निळा रंग त्या थंडीने पार काळवटून टाकला होता.....
एकही बोट तुझ्या रंगात तरंगत नव्हती....कि एखादे धीट चिटपाखरू तुझ्याजवळ येत नव्हते.
ते तुझे असह्य्यपण होते कि माझे......
कधी नव्हे ते मला तुझ्या जवळ यावेसे वाटले नाही...तुझ्या पाण्याला स्पर्श करावा वाटला नाही....
त्या थंड पाण्याचा स्पर्श आठवला तरी मृत्युची एक लहर जाते शरीरातून....
आणि झोकून द्यावेसे वाटते स्वताला त्या डोहात.....शांत थंड जीवन.........
आता बरसू नकोस पाऊस होऊन असा....
.......................... .......................... ..अस्मित
ते तुझे असह्य्यपण होते कि माझे......
कधी नव्हे ते मला तुझ्या जवळ यावेसे वाटले नाही...तुझ्या पाण्याला स्पर्श करावा वाटला नाही....
त्या थंड पाण्याचा स्पर्श आठवला तरी मृत्युची एक लहर जाते शरीरातून....
आणि झोकून द्यावेसे वाटते स्वताला त्या डोहात.....शांत थंड जीवन.........
आता बरसू नकोस पाऊस होऊन असा....
..........................
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)