बुधवार, ३० मे, २०१२

"कविता"


कवितेवरची "कविता"
काल मला कविता भेटली
बसली होती फुरंगटून कोपर्‍यात कुठेतरी,
विचारले तिला काय झाले बाई तुला????
डोळ्यात पाणी आणून, थोडस रागवून
म्हणाली, "आणखी किती भावनांच ओझ बाळगू मी?"
"माझ्या भावना जाणून घेणार का कधी??"

हे ऐकून मीही विचारात पडले, म्हणाले कवितेला "खरच माझे चुकले."

माझ्या भावना व्यक्त करायला, शब्द शब्द जोडले,
त्यावर स्वल्पविराम, पुर्णविरामांची बंधने लादली..
"तुला" जन्माला घातले..
त्याच बंधनांचा आज तुला त्रास होतोय...

तू जन्माला आलीस की सगळे लोक तुला "त्यांचीच" समजायचे..
"किती छान", "वा वा", "अप्रतीम" या आणि अश्या अनेक शब्दांनी तुझी स्तुती करायचे...
पण ती स्तुती ही पुन्हा "शब्दंच" ना?


तू मुक्त,
तू स्वछंदी,
तू अपार,
तू निराकार,
आणि मी वेडी तुला बांधून ठेवायचा प्रयत्न करत होते...
आणि कविता " हसली..."
कारण.....?????? अस्मित


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: