बुधवार, ४ नोव्हेंबर, २००९


एक दिन एक बंदा निकल पड़ा खुदा की खोज में.
छोड़ दिया अपना महल, एशोआराम, अपनी पत्नी और बेटा;सबकुछ.
चल पड़ा न जाने कितने कोस दूर......
लेकिन क्या देखा उसने???
दुख से पीड़ित कोई रो रहा था,
बुढ़ापे से थका हुआ कोई कोस रहा था,
कोई निकल पड़ा था अपनी अंतिम यात्रा पे.....
सोच में पड़ गया बंदा बेचारा, बोला " इतने कष्ट में है दुनिया और खुदा......वो कहाँ है????
क्यूँ कोई किसीकि मदत नही कर पा रहा???"
इसी सवालोंसे परेशान चल पड़ा आगे,
एक पेड़ की छाव में बैठकर खो गया अपने ही ख़यालों में.
ना जाने कितने दिन बीत गये.....अपनी ही खोज में.
और बंदे को पता ना चला वो ही किसिका खुदा बन गया.

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

पाडसाचे पप्पा





स्पर्श



अबोल प्रीत....



उलट कविता

कस काय बर हाय
खाली डोके वर पाय

उलटी दुनिया उलटीच रीत
उलट्या माणसांचे उलटेच काळीज

मीही आता उलटाच वागेन म्हणतो
जगात देखील उलटा आलो;
जातानाही उलटाच जातो.

उलटे नियम बनवेन मी
उलटी गाडी हाकेन मी
तुझ्या सरळ प्रश्नाना उलटी उत्तरे देईन मी.

घराकडे सरळ जाणारी पाऊलेही उलटी
उलट उलट शब्दांची कविताही उलटीच

जाता जाता एक गोष्ट चांगली करेन मी;
माझ्या या उलट कवितेतला पूर्णविराम सुलट ठेवेनं मी.

घरे काळजाला पडली,

घरे काळजाला पडली,
काही परकी, काही आपली...
देणे प्रेमाचे,
लेणे आठवणींचे,
देता-घेता दमलो,
वाट ही दश-दिशा कोंडली...
घरे काळजाला पडली,
काही परकी, काही आपली...
क्षण एक सुखाचा,
असतो तरी कसा?
त्या एका क्षणा साठी
आयुष्ये पणाला लागली...
घरे काळजाला पडली,
काही परकी, काही आपली...

घड्याळ....

काही लोक घड्याळ पाहून 'प्रेम' करतात म्हणे......
अमुक इतके वाजता भेटायचे;
इतके वाजता परत जायचे, नाहीतर घरचे रागावतील.....
इतके वाजता या ठिकाणी नको, ओळखीचे लोक बघतील....
आणि आणखीन बरंच काही.....
मी तर प्रेमात तर सोडाच, पण तिच्या विरहात देखील एवढा वेळ वाया घालवलाय ज्याची काही गणतीच नाहीये...
खरेच का वेळ वाया घालवलाय?
मी अजूनही तिची तेवढ्याच आतुरतेने वाट का पाहतोय....?
तिला ज्याची जाणीवही नाहीये.....

ती रमली असेल तिच्या संसारामधे आकंठ,
की माझीच वाट पाहत असेल, या कातरवेळी.....

नुसतेच प्रश्न आणि त्याला सोबत करणारे घड्याळाचे काटे.......
अखंड चक्र......अखंड आठवणी.......
आता तुझ्याशिवाय यातून सुटका नाही..........

दिवाळी वेदनांची

दिवाळी वेदनांची,
शेतकर्यांच्या आत्महत्येची,
गरीबांना न परवडणारी,
अन् श्रीमंतांच्या चैनीची
दिवाळी वेदनांची...
इथे दिव्यांची रोषणाई,
तिथे अश्रूंची आरास,
इथे शोभेची दारू,
तिथे कुणा-कुणाचा शोक आवरू?
इथे गोड-धोड फराळ,
तिथे एक वेळ ची आबाळ,
इथे नवे-नवे पोशाख,
तिथे त्यांच्या संसाराची राख,
महागाई, दरवाढ, भ्रष्टाचार, दुष्काळ,
यांचं या सणावर सावट,
म्हणूनच ही दिवाळी वेदनांची,
शेतकर्यांच्या आत्महत्येची....

फिरुनी, नवा जन्मलो....

मी माझा न् राहिलो
तुझा तुझाच जाहलो
सखे, तुझ्यामुळेच मी फिरुनी, नवा जन्मलो....

शब्द होते खुंटले,
स्तब्ध जग सारे,
तुझ्या येण्याने फुलले जीवन माझे,
पुन्हा नव्याने मी जगया लागलो,
सखे, तुझ्यामुळेच मी फिरुनी, नवा जन्मलो....

तुझ्या येण्याची किमया सारी,
वसंताने बघ साद घातली,
रोम रोमातून मी, पुन्हा, बहराया लागलो,
सखे, तुझ्यामुळेच मी फिरुनी, नवा जन्मलो....


पाडस

छोटे छोटेसे पाडस माझे
इवले इवले गोड गोजिरे,
नटखट अवखळ तितकेच प्यारे
सर्वाहून ते सुंदर न्यारे.

गर गर गर गर गिरकी घेते,
फुलपाखरा सवे बागडते
गाणे गाते हसते खेळते,
थकून जाता कुशीत येते.

माझ्या श्वासांची गरज..........

माझ्या श्वासांना गरज आहे तुझी ......
जशी रात्रीस चंद्राची, दिवसास भास्कराची तशीच माझ्या श्वासांना गरज आहे ''तुझी'' ......
जशी धरणीस बरसातीची, सागरास सरितेची, प्राणास चेतनेची तशीच माझ्या श्वासांना गरज आहे ''तुझी'' ......
तूझ्याविना मी कशी राहू, विरह वेदनेत कशी जगू??
तुझ्यात मी आणि माझ्यात ''तू'' आणि म्हणूनच माझ्या श्वासांची गरज ''तू''

??

आयुष्यात पडलेले प्रश्‍न, की प्रश्नात अडकलेले आयुष्य
काय खरे काय खोटे कोणाला विचारावे,कोणाला ठावे?
या देहाला दिली गेलेली असंख्य नावे, आणि त्या नावातून निघणारे असंख्य अर्थ
खरेच हीच माझी ओळख, की अजूनही सापडले नाही मीच माझी मला??
:-अस्मित

शब्द शब्द शब्द.................

शब्द शब्द शब्द,
एकमेकांना जोडले,
त्यांचे अर्थ मात्र...
प्रत्येकाने स्वत:च लावले....

शब्दांची दुनिया सारी,
शब्दान्नीच प्रीति केली,
शब्दांनी शब्दांना जाणले,
शब्दांनी शब्दांना समजावले

शब्दांचा हा खेळ,
सारा शब्दांचाच मेळ,
शब्द शब्दांसाठी जन्मले,
शब्द शब्दांसाठी जगले

शब्द झेलले, शब्द भोगले,
शब्द निर्मिले, शब्द विलया गेले,
शब्दांची रीत निराळी,
तुला न् मला कधी ना कळली,
-अस्मित

मुके शब्द

मुके शब्द, मुके गीत गाती,
हृदयात जपली, अनामिक नाती,
कशासाठी हा आक्रंद?
का, तुटलेल्या नात्यांना जपण्याचा छन्द ?
नाती सुखावती, नाती दुखावती,
नात्यान्मधे का तारेवरच्या कसरती?
नाते एकाने जीवापाड जपावे,
दुसर्याने, भातुकली समजुन क्षणात मोडावे?
नातं हे नातंच असतं,
तुटलं तरी ते 'तुटलेलं' नातं असतं
एवढ्या साठीच हा आक्रंद....
तुटलेल्या नात्यांना जपण्याचा छन्द....
- अस्मित

मलाच मी उमजेना....

वेदनांची वाट मोकळी,
करू कसे हे समजेना,
मी जाणतोच सगळं,
पण मलाच मी उमजेना....
दु:खभरल्या या मनाला,
दे जरासा तू दिलासा,
पापणीत थांबावं की वाहत रहावं,
हे अश्रूंनाही कळेना...
मी जाणतोच सगळं,
पण मलाच मी उमजेना....
माझ्या मुठीतले हे निखारे,
तव स्पर्शाने शीतल व्हावे,
त्या स्पर्शाची वाट पाहणे,
अजुनही सरेना ....
मी जाणतोच सगळं,
पण मलाच मी उमजेना....
- अस्मित

पाऊस

खिडकी बाहेर अखंड कोसळणारा पाऊस
आज पुन्हा आठवणींची तार छेडुन गेला.
आणि माझ्या हृदयातील तुझ्या आठवांची फायर प्लेस तापवत राहिला.
परत एकदा फिरून पाहिल्या आपल्या भेटीच्या जागा, ते संकेत,
तू भरभरून दिलेले सगळे क्षण, परत एकदा, एकटयानेच जगलो,
तरी अजूनही नाही उमजत, तू एवढे ओंजळ भरून दिलेस आणि मी अजूनही असा रिकामाच का?
:-अस्मित

Sujata Pohekar

Nothing to tell much.
May be my words will tell you more about me..... :)
Its a small try by Me and Amit to play with words.
Please post your comments,suggestions etc.
Waiting...............