मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

दिवाळी वेदनांची

दिवाळी वेदनांची,
शेतकर्यांच्या आत्महत्येची,
गरीबांना न परवडणारी,
अन् श्रीमंतांच्या चैनीची
दिवाळी वेदनांची...
इथे दिव्यांची रोषणाई,
तिथे अश्रूंची आरास,
इथे शोभेची दारू,
तिथे कुणा-कुणाचा शोक आवरू?
इथे गोड-धोड फराळ,
तिथे एक वेळ ची आबाळ,
इथे नवे-नवे पोशाख,
तिथे त्यांच्या संसाराची राख,
महागाई, दरवाढ, भ्रष्टाचार, दुष्काळ,
यांचं या सणावर सावट,
म्हणूनच ही दिवाळी वेदनांची,
शेतकर्यांच्या आत्महत्येची....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: