कॅलिडोस्कोप : 2
उन्हाळा आणि आजोबा
उन्हाळ्याची सुट्टीतील आणखीन एक गंमत म्हणजे आज्जी-आजोबांच्या घरी जाऊन राहणे. म्हणायला आमचं कुटुंब एकत्र असले तरी, कामाच्या निमित्ताने आणि शाळेच्या सोयीसाठी सगळे वेगवेगळ्या ठिकाणी रहातो.
आज्जी-आजोबांच्या घरी गेलो कि दर उन्हाळ्यात हमखास केली जाणारी गोष्ट म्हणजे आईस्क्रीम, भेळ , कलिंगड, घरच्या आवळा / लिंबाचे सरबत या सगळ्यांची एक-एक दिवस पार्टी.
आमचे आजोबा (आम्ही त्यांना "दादा" म्हणतो) आमच्या घरातील सगळ्यात जास्त उत्साही प्राणी. आम्ही सगळी भावंडे जमलो कि साधारण ४ च्या सुमाराला पार्टीची सुरुवात व्हायची. एक दिवस आईस्क्रीम तर दुसरा दिवस कलिंगडाचा नाहीतर भेळीचा. आईस्क्रीम सारखी गोष्ट कप विकत घेऊन खाणे हे दादांना कधी पसंत नसावे किंवा बहुदा ते त्यांना मान्यच नसावे कदाचिद. कारण आईस्क्रीमवाला आला कि दादा आम्हाला कोणालाही न कळविता त्या आईस्क्रीमवाल्याकडून एक अख्खा कॅन घेऊन यायचे. कधीकधी तर ३ वेगळ्या आईस्क्रीमचे ३ कॅन आणत असत.हि आईस्क्रीम कोणतीही ब्रॅण्डेड आईस्क्रीम नसायची, तर लाकडी आईस्क्रीम पॉट वापरून घरी तयार केलेली टिपिकल गुलाबी, पिस्ता आणि आंबा कलर असणारी होती.आणि तिचा स्वाद त्याच्या सोबतच्या पानामुळेच चांगला लागतो असा माझा अजूनही विश्वास आहे(ती पाने कोणत्या झाडाची होती त्याबद्दल मला काही माहित नाही.) घरात जाऊन हाताला जे लागेल ते भांडे आणि चमचा घेऊन आईस्क्रीम खायला आमची लगबग सुरु व्हायची.आमची आईस्क्रीम पंगत संपेपर्यंत तो आईस्क्रीमवाला जिन्याखाली मस्त ताणून द्यायचा.
कलिंगड खाताना पण थोड्याफार फरकाने हे असेच चालायचे. सकाळी कलिंगड आणले कि ते बादलीत बुडवून ठेवायचे, म्हणजे ते दुपारपर्यंत गार व्हायचे. आणि दुपारच्या झोपा झाल्या कि दादा ते कलिंगड व्यवस्थित तुकडे करून, बिया काढून, त्यावर मीठ टाकून तयार ठेवायचे. त्यावेळी घरात काटे चमच्यांचे फारसे प्रस्थ नव्हते. घरात एकुलताएक छोटासा, २ काटे असणारा चमचा होता. कोणाच्याही नकळत, आधीच तो चमचा आपल्याकडे कोण घेतंय यावरून आमची चुरस लागायची. ज्याला तो चमचा मिळायचा तो विजयी वीर स्वतःचे खाऊन झाले कि दुसऱ्यांना देणार अथवा दादांची दुसरी युक्ती म्हणजे टाचणीच्या टोकाने कलिंगड उचलून खायचे.पपई, ताडगोळे असेच टाचणीच्या टोकाने उचलून खाल्ल्याचे स्मरते.
जिलेबी,मैसूरपाक,पापडी, आज्जीने केलेले ढोकळे,डोसे,मेदूवडे असे कितीतरी पदार्थ असायचे. ज्या कुठल्या पदार्थाची पार्टी असायची तो सगळ्यांना पोटभर होईल असाच आणला अथवा बनविला जायचा.
आणि या सगळ्या आनंदाच्या वरचा कहर म्हणजे रात्री गच्चीत (वरचे माजले बांधले नसल्याने घराच्या या भागाला गच्ची म्हणावे कि नाही ते तुम्हीच ठरवा) जाऊन रेल्वेडब्या प्रमाणे झोपणे ते सुद्धा दादांकडून गोष्टी ऐकत.त्यांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे "आत्ता होती कुठे गेली?". आजही त्यांना गोष्ट सांगा म्हणाले तर ते नक्की हि गोष्ट सांगतील याची पक्की खात्री आहे.
आजोबा आणि आमची वये वाढलीयेत. त्यांचा उत्साह तोच आहे आणि आमच्यातील बालपण सुद्धा तसेच आहे अजूनही…फक्त उन्हाळ्याची सुट्टी कधी मिळतेय याची वाट पाहतोय.
.......................... ..अस्मित

..........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा