कॅलिडोस्कोप - ३
माझी कांचीपुरम भेट : भक्तीचा शोध...............
या वेळेस ऑगस्ट महिन्याची कृपा झाली आणि शुक्रवार ते रविवार जोडून सुट्टी मिळाली.कामाच्या व्यापातून वेळ काढत एकटीनेच कांचीपुरमला जाण्याचे ठरविले.
तांबरम जंक्शन पासून सोयीस्कर बस सेवा उपलब्ध असल्याने एकटीने फिरणे सोपे गेले.
सकाळी ७ ला निघाले आणि दोन बस बदलत साधारण ९ ला कांचीपुरम ला पोहोचले. सर्वात आधी पोटपूजा केल्यावर मग देवदर्शन यात्रा सुरु झाली.
हे शहर चेन्नई पासून साधारण ७२ किमी अंतरावर वेगवती नदीच्या काठी वसलेले आहे.कांचीपुरम शहर हे भारतातील ७ मोक्ष मिळवण्याच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे.येथे पल्लव आणि चोला यांची राज्ये होऊन गेली. " कां " म्हणजे ब्रम्हा आणि "अंची " म्हणजे ब्रम्हाने केलेली विष्णूची पूजा असे मिळून या शहराचे नाव कांचीपुरम झाले. विष्णूच्या १०८ पवित्र मंदिरांपैकी १४ मंदिरे कांचीपुरम मध्ये आहेत, त्यातील मी फक्त एकच मंदिर पूर्णपणे पाहू शकले ते म्हणजे वरधराज पेरूमल मंदिर.
वरधराज पेरूमल मंदिर "पेरूमल कोइल" या नावाने ओळखले जाते. "कोइल" म्हणजे देऊळ आणि "मलय" (पेरू'मल') म्हणजे "टेकडी".
बस मधून जातानाच हे मंदिर आपल्या नजरेस पडते. मंदिरा भोवतालची भली मोठी भिंत आणि कळस दुरूनच आपल्याला दिसतो.आजूबाजूला खूप सारे पोपट शाळा भरल्याप्रमाणे विजेच्या तारांवर एका रांगेत बसून असलेले दिसतात.
हे मंदिर २३ एकर मध्ये वसलेले आहे.या मंदिरातील मांडणी विश्वकर्मा स्थापत्यकलेवर आधारित आहे. तेथील मूर्तींची कलाकुसर अजूनही उत्तम स्थितीत आहे. या मंदिराचे ३ उप-प्रकार आहेत : अझवार, मडाई पल्ली आणि थिरु मलई. मंदिरात ३२ देवळे, १९ ध्वजस्तंभ आणि ३८९ खांब असलेला सभामंडप (सिंहाची मूर्ती असलेला / याली प्रकारातील मूर्ती) आणि तलाव आहेत.येथील वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडातून कोरलेली भली मोठी दगडी साखळी. मंदिरातील मुख्य मूर्तीशिवाय येथे वरधराज स्वामींची लाकडामध्ये कोरलेली मूर्ती एका चांदीच्या खोक्यात ठेवलेली आहे. त्यामधून दर ४० वर्षांनी पाणी काढून टाकण्यात येते. (मला या पाण्याचा काही संदर्भ लागला नाही.) नरसिंहाच्या मूर्तीवर एक मुखवटा आहे. तो मुखवटा रहस्यमय असल्याचे मानण्यात येते. त्या मुखवट्यामध्ये गूढ शक्ती वास करते असा येथील लोकांचा समज आहे.
भगवान विष्णू सगळ्यांच्या मनोकामना ऐकून घेतात आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून विष्णूला "वरदार" (देणारा) असे नाव देण्यात आले आहे.
देवळामध्ये खूप मोठ्या छत्र्या आहेत,एका वेळेस एका माणसाला त्या उचलणे अवघड जाते. गाभाऱ्यात प्रवेश करण्याचे मार्ग एवढे चिंचोळे आहेत कि एखादा जाड माणूस अडकला तर एकंदर परिस्थिती अवघड होऊन बसेल.
या देवळातील व्यवस्थापन मात्र खूप खराब आहे. देवळात जाताना घेतलेला नारळ आणि फुले देवळातून बाहेर पडले तरी नक्की कुठे द्यायचे याचा अजिबात मागमूस लागला नाही. शेवटी तसेच घरी घेऊन यावे लागले.
मंदिरातील एकंदर वातावरण मला तरी फार काही भावले नाही. दर्शनासाठी रांगेत उभे असताना माझ्या समोरील एक जोडपे जे काही करत होते त्यावरून क्षणभर आपण नक्की देवळात उभे आहोत कि सारसबाग मध्ये असा विचार मनात येउन गेला.
देवळात सुद्धा ज्यांना वासना दूर ठेवता येत नाहीत अशांना देव कधी कळला असेल का???
देवळात एके ठिकाणी सोने आणि चांदीची पाल भिंतीवर लावलेली आहे.इंद्राने माता लक्ष्मीच्या शापातून मुक्त झाल्यावर या पाली वाहिल्या असे मानले जाते.
२ रु. चे तिकीट काढून शिडीवर चढून त्या पालींना हात लावला कि तुमची पापे धुवून निघतात. संपूर्ण चेन्नई मधेच एवढ्या पाली आहेत, विशेषत: माझ्या घरात त्यांचा असा काही मुक्त वावर आहे कि मला नक्की खात्री आहे कि मी आणि माझ्या पुढच्या असंख्य पिढ्या पापमुक्त झाल्यात.
देवळाच्या आवारात एकेठिकाणी प्रसाद विकत मिळतो. १०० रु. मध्ये गोड, तिखट आणि दही अशा ३ प्रकारचे भात, पापड, मोठी चकली, लाडू, अनारसा असा भरपूर प्रसाद दिला जातो, कि वेगळे जेवण जेवण्याची गरज उरत नाही.
या वेळेस हे एकच देऊळ पाहून झाले. पुढच्या भेटीत इतर देवळांना भेटी देऊन देवाला भक्तांचे दर्शन होते का ते पाहूया.
.......................... ....अस्मित
चूकभूल द्यावीघ्यावी.
(source of information friends and of course Mr.Google )
All rights are reserved by Sujata Pohekar.

..........................
चूकभूल द्यावीघ्यावी.
(source of information friends and of course Mr.Google )
All rights are reserved by Sujata Pohekar.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा