"कॅलिडोस्कोप"............४
"A Walk to Remember"
नवीन घरी रहायला आल्यापासून अपेक्षेप्रमाणे चांगल्या गोष्टी घडू लागल्या होत्या.त्यापैकी एक चांगली गोष्ट म्हणजे २ वर्षांच्या विश्रांती (?) नंतर परत सुरु केलेला व्यायाम.परंतु रविवार पर्यंत हे व्यायाम वेड असा काही ठेवणीतला अनुभव देईन असे कधी मनात देखील आले नव्हते.
झाले असे कि, गेले २ दिवस (म्हणजे सकाळचे ५ / ६ वाजता )एका मित्रा सोबत समुद्र किनारी चालायला जात होते.
भल्या पहाटेचा समुद्र आणि वाळूवरचे चालणे यासारखा सुखद अनुभव आणि त्याचे फायदे तुम्ही अनुभवायलाच हवेत.(खरेतर, इथे बरेच अलंकारिक शब्द वापरून माझ्या लेखाची उंची आणि लांबी वाढवू शकत होते, परंतु प्रत्येक वेळेस भावना आणि शब्दांची फोडणी दिलीच पाहिजे असे मला तरी वाटत नाही.)
तर, रविवारी साधारण १.५ - २ कि.मी. चालणे झाल्यानंतर जवळच असणारे जगन्नाथ मंदिर पाहण्याचे ठरविले. थोडावेळ किनाऱ्यावरून चालून झाल्यावर, रस्ता भटकू नये म्हणून आम्ही मुख्य रस्त्यावरून चालायला सुरुवात केली.रस्त्यावरून अनवाणी पायाने चालताना सुरुवातीला काही त्रास जाणविला नाही.गप्पा मारत मारत आमची पदयात्रा सुरु होती.गप्पांचे विषयही अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशर असे असल्याने पायाला टोचणारी खडी साक्षात त्याचाच अनुभव देत होती.
काही कि.मी. अंतर चालून गेल्यावर जेव्हां पावलांचा तोल जातोय असे वाटू लागले तेव्हां मात्र देऊळ कुठेय आणि केव्हां येईल याचा ध्यास लागला.थोडे पुढे, आणखी थोडे पुढे, जवळच आलोय अशी समजूत घालत चालत राहिलो. काही वेळाने जेव्हां लक्षात आले कि परत तेवढेच अंतर चालून परत जायचे आहे तेव्हां मात्र अवसान गळाले. (आम्ही कारला विश्रांती देऊन एवढे लांब आलो होतो.) तोपर्यंत आम्ही साधारण ८-९ कि.मी. अंतर चालून झाले होते.परत एवढे अंतर कापून माघारी जाणे शक्य नसल्याने रिक्षा करून परत जाऊ असे मनात येत असतानाच आठविले कि उत्साहाच्या भरात आम्ही पैशाची पाकिटे गाडीतच ठेवली होती. आमच्याकडे पाहून कोणी बस भाड्या पुरते पण पैसे दिले नसते. स्वतःवरच हसत आम्ही देवळाच्या दिशेने चालत राहिलो आणि एकदाचे देवळात पोहोचलो.
देवळाचा परिसर आणि एकंदर बांधकाम पाहून चालत आल्याचे सार्थक झाल्याचे जाणविले.हे देऊळ कोळीवाड्याच्या परिसरात असून येथे माशांचा अजिबातवास येत नव्हता हे विशेष.देवळाचा परिसर अत्यंत स्वच्छ होता.
देवळात मुख्य जगन्नाथ,सुभद्रा आणि बलराम यांच्या मूर्तींखेरीज योगनरसिन्ह, शंकर, गजलक्ष्मि आणि विमला देवी, नवग्रह यांच्या मूर्ती आहेत. या देवळाची बांधणी ओरिया पद्धतीने कांचीपुरम वरून आणलेल्या काळ्या कणाश्म (ग्रॅनाइट) आणि राजस्थान मधील सफेद संगमरवर वापरून करण्यात आलेली आहे.देवळाच्या सभोवताली १ एकर जागेत खूप सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे आणि त्या बगीच्यातील फुले पूजेसाठी वापरली जातात. पुजारी सुद्धा ओरिसामधून आलेले आहेत. पूजा-अर्चा आणि मंत्र पठण सगळे काही ओरिया भाषेत चालते. हे देऊळ साधारण ७ वर्षांपूर्वी बांधलेले आहे. देवळातील मुख्य मूर्ती ओरिसातील जगन्नाथ मंदिराप्रमाणेच कडूनिंबाच्या लाकडापासून बनविलेल्या आहेत. ज्यादिवशी जगन्नाथपुरीची रथ यात्रा असते त्याच दिवशी येथे पण रथ यात्रा काढली जाते. हा रथ स्टिल, लाकूड आणि कापड वापरून बनविण्यात आलेला आहे. मंदिराचे विश्वस्थ प्रा.स.न.माझि (Prof. S.N. Majhi) यांच्या सांगण्यानुसार हा जगातील एकमेव स्टीलचा रथ आहे.देवळाच्या भिंतींवर आणि छतावर ओरिसाच्या पारंपारिक चित्रकारी नुसार (pata painting) पौराणिक कथांमधील दृश्य रंगविण्यात आलेली आहेत.
दर्शन झाल्यानंतर आम्ही देवळाच्या आवारात थोडावेळ बसलो (तो पर्यंत आम्ही एकही ठिकाणी थांबलो नव्हतो). परत कसे जायचे या बद्दल विचार करत असताना माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी देवळातच थांबावे आणि ते लिफ्टची सोय करून, परत जाऊन गाडी घेऊन येतील असे ठरले.सुदैवाने त्यांना लिफ्ट मिळाली आणि पाऊण तासात मला घ्यायला ते परत देवळात आले.
अशा प्रकारे सकाळी ५:३० ला सुरु केलेला व्यायाम ११ वाजता संपला आणि आमच्या या चालण्याच्या वेडाने आम्हाला एक अविस्मरणीय अनुभव दिला.
.......................... .......................... .......................... ......अस्मित
(२४ ऑक्टो २०१३)
(फोटो आणि देवळाची माहिती : गुगल आणि माझे मित्र यांच्या कडून साभार)

..........................
(२४ ऑक्टो २०१३)
(फोटो आणि देवळाची माहिती : गुगल आणि माझे मित्र यांच्या कडून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा