शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

कहा था...!!!!


कहा था तुमसे कोई याद छोड़ के मत जाना अपनी,

फिर भी जाते हुए तेरे पैरोंने अपने निशान बना दिए मेरे दिल पे.

क्यूँ दे गये अपना पता, जबकि उस घर में मेरा आना मना था.

भिजवा दिये वो ख़याल जिसमें तेरी खुशबू बसी थी,

लेकिन मेरे सासोंको पनाह देना तुम्हें नामंज़ूर था.

तुम्हारे हर एक सुर का अपने कानों में बसेरा बनाया था मैने

मेरी हर एक मैफिल को वीरान कर दिया तुमने

तुम दे गये मुझे जीने की वजह,

लेकिन मेरा मर जाना कबूल था तुम्हे - अस्मित

मीरा-मेघ-मी......

नेहमीच बरसत राहीले त्या एका रंगा साठी.....

तो मात्र अडकूनी राहिला राधा आणि रूक्मिणी साठी

मीरेचे विष भिनले त्याच्या कंठात....

सूर वाजत राहीले फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी

मेघ बनुनि शोध घेतला सागरतळि...

त्याने विरह चेतवत ठेवला क्षणोक्षणि...

ना सोडले एकटे कधी या अधुर्‍या मैफीलीत तरी.....

समोर असूनी अंतर राखले नंतर लाज बाळगण्यापरी....अस्मित

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

साल आजकाल काही सुचतच नाही,
मनात अंधारा व्यतिरिक्त कोणी उतरतच नाही...अस्मित


तुझे अबोलपण हृदयावर वार करून गेले,
माझ्या शब्दांचे घर तूच उध्वस्त केले. अस्मित

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०११

सगळे एकाच......की.......वेगवेगळे........??????


जन्माला आल्यानंतर देहाला नाव देताना केलेला हवन,
आणि त्या सोबत असणारा अग्नी...

सर्वांच्या साक्षीने एकमेकांचे नाव घेताना
... समोर असलेला अग्नी.....

साखर-मधात घोळलेले शब्द , बकुळ-चंदनाने सुगंधलेले श्वास
दोन शरीर-आत्म्याना असलेली पूर्णत्वाची आस आणि तापलेला अग्नी.....

तुझ्या पासून दूर जाताना शेवटच्या क्षणांनी दिलेला अग्नी.........
सगळे एकाच......की.......वेगवेगळे........??????- अस्मित

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

तू आणि वादळ

खिडकीत उभे राहून वादळ झेलणारा तू..., तुझ्या मागे कुठेतरी उभी असलेली ती....

आणि दोघांमधे वाहत असलेली अनेक वर्ष......

दरवेळेस काही गोष्टी अपूर्ण ठेवल्याच पाहिजेत का?????

जीवनात पूर्णता ही कधीतरी हवीच की....

जे घडून गेल त्या बद्दल वाईट का वाटून घ्यायच...? जेव्हा थोपवता येत असताना हात मागे घेतले गेले.....

निर्णय स्वतःचेच, मग ते आता बोचू का लागले....?????

पुढे टाकलेल्या पावलाकडे मागे वळून का बघायच.....?

समोर उभ्या असलेल्या नवीन "ती" ला कधीच का नाही जवळ करायच....????

या पुढील तुज्या कविता कधीच अपूर्ण नसतील...

कारण तुझ्यावर येणारी वादळे "मी" अडवलेली असतील......: अस्मित


कान्हाच प्रेम कान्हाच दुरावा
कान्हा कान्हा करता देव माझ्यात उतरावा : Asmit
जन्म देऊन उपेक्षीली देवकी
प्रेम मिळून सुद्धा कान्हाची झोळि पोरकी.... asmit
प्रेम माझे जणू मीरेची साधकता,
जवळ नसले तरी आत्म्याची एकरूपता...Asmit


क्या कहूँ यारों,

क्या कहूँ यारों, आज मैने अपने आपको भीड़ मैं खो दिया..
क्या कहूँ यारों, आज मैने अपने को है पा लिया.

वो भीड़ भी क्या जिसका चेहरा हम ना बन सके,
वो महफ़िल भी क्या जिसका चिराग हम ना जला सके
न जाने किस तरह से अपने आपको बचाया हमने.

तनहा था हर एक शक्स फिर भी अपने को तराशे हुए रखता था,
ना जाने किसके इंतजार में थे सब, फूलोंसे सजाके रखा था....
वक़्त बीत गया ना कोई आया....फूलोंको बोतल में बंद करके रखा हमने.

झूमती हुई महफ़िल में, झूमते हुए उन हवाओंके साथ...
फिर कोई आवाज़ उठी और उन साहिल पे अपने आपको फिर खो दिया हमने.- अस्मित

शनिवार, १३ ऑगस्ट, २०११

काही नसत रे बाकी.....


काही नसत रे बाकी.....आईच्या उदरातून बाहेर पडल्यावर पहिल्यांदा रडतो ना, तेव्हां खरे आपण.....
दमछाक झाल्यावर हात पसरून उर भरून मोकळा श्‍वास घेतो ना, तेव्हां खरे आपण.....
भर पावसात तिच्या सोबत आइस क्रीम खाताना पाउस+आइस्क्रीम आणि तिचे ओठ या सगळ्यांची अशी एकत्रचव जेव्हां जिभेवर रेंगाळते तेव्हां खरे आपण.........
पहिल्या पगारातून मित्रांना घेऊन केलेली पार्टी, आणि घरी आल्यावर वडिलांनी दिलेली विश्‍वासपूर्ण घट्ट मिठी, त्या मिठीत असतो आपण.......
घरी यायला उशीर झाल्यावर, आईच्या नजरेच्या काळजीत असतो आपण......
हवेत उचलेल्या बाळाच्या हसण्यात असतो आपण...........
शेवटच्या क्षणी चेहर्‍या वरच्या समाधानात असतो आपण.....- अस्मित

तू, मी आणि आपले नाते.....

तू मित्र आहेस माझा पहिल्यांदा भेटलेला,
तू प्रियकर आहेस तलावा पाशी थांबलेला,
तू बहीण आहेस माझी सगळी गुपिते संभाळणारा,
तू भाऊ आहेस माझी रक्षा करणारा,
तू पिता आहेस काळजी करणारा,
तू आई आहेस चूक पदरात घालणारा,
तू नवरा आहेस मला पूर्णत्व देणारा.... :- अस्मित

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११


अपने आप को हमेशा मुझसे छुपाए तुमने...
दूसरोंको पर्बत की उचईयाँ पार करने का होसला दिलाते रहे...

लेकिन खुद को समंदर की गहराइयों की तरह दूर रखा मुझसे.....

उस दिन याद है तुमको, बारिशमें भीगते हुए रो रहे थे तुम,

मैने कारण पूछा ; तो बोले "कुछ ऩही, बारिश का पानी आखोंमें उतर गया है"....

बाद मैं पता चला, मोड़ पे वो पेड़ बूढ़ा हो गया था......

एक सवाल पूछूँ? " बाबूजी की बरसी थी ना ?????

तुम्हारे बिस्तर पर उनका कोट मिला था सुबह, गीला था....बारिश के पानी से......

हमेशा सोचती हूँ के तुम्हारी नजमें इतनी तनहा क्यूँ थी....

तुम्हारी तनहाई मुझमें नही इनमें उतरा किया करती थी......

मैने तो तुम्हारी आहटोंको पढ़ना सीखा था.....

क़लम तुम्हारी आहटें जिया करती थी......

बड़ी कोशिश की, पर तुम्हारी रात का पिटारा कभी तुमने मेरे सामने खोला ही ऩही.....

और मेरी सारी रातें बुझे हुए तारोंसे जलाई मैने......अस्मित
कृष्ण सावळा , राधा गोरी...
गोड हि पावरी मुग्ध राधे परि
....................... पण या साऱ्यात ती कुठेय ? :
त्रिवेणी - अस्मित
जखमांच्या प्रदेशात बसलो
घेऊन मुठीत या जिवाला
उरले काही क्षण, थोडे तुला थोडे मला : अस्मित

मंगळवार, २ ऑगस्ट, २०११


तो क्या हुआ अगर मैने तुम्हारे लिये चांद तारे नही तोडे,
मेरी सांसे तो तुम्हे दी मैने,
क्या हुआ अगर तुम्हारी सेज फुलोन्से नही सजाई,
तुम्हारा सर सिने पे रखकर राते काटी मैने,
ताकी तुम अपने सपनोंको पुरा कर सको,
माना कि मैने तोह्फे मे कभी गेहने नही दिये,
लेकीन तुम्हारे रास्ते मे मुश्किले न आये इसलिये तुम्हारा रास्ता बना रहा..........
क्या हुआ अगर तुम्हारे लिये वक्त नही निकाल पाया ,
तुम्हारे लिये घर तो बनाया मैने....
क्या हुआ अगर तुम्हारे साथ नही हुं.....
तुम्हारा दिल तो संभाला मैने... आजतक
और शायद हमेशा के लिये...!!!

-अस्मित

बुधवार, २७ जुलै, २०११


कितनी बार समझाया , कितनी मर्तभा ठोकर खाई....
फिरभी भरोसा करना ऩही छोड़ोगे तुम.
ये दुनिया ऐसी नही जैसा तुम इसे देखते हो, मानते हो,
इसके कुछ अपने उसूल है जिसमें तुम ऩही समाते.
फिर भी न जाने कितने ख़्वाब लिये तुम इसमें जीते रहते हो.
थक ऩही जाते ये रोज क़ी मायूसिसे से????
तेरा ये जीने का सरूर रोज तुम्हे चेहरोंके समंदर में ढकेलटा है,
और लाके छोड़ देता हैउ वहीं किनारे जहाँ पे तुमने अपनी पहली सांस ली...
थक ऩही जाते रोज की सासोंसे????
क्यूँ करतेहो दुनियाँ बदलने की कोशिश, जबकि तुमने अपने आपको ऩही बदला इतने सालोंमें..
कितने साल बीत गये , न तुम बदले न चेहरे...
हाँ, लेकिन तुम्हें संभालने वाली अम्मा ज़रूर बूढ़ी हो गयी.
थक ऩही गये इस रुकावट से???? : अस्मित

मंगळवार, २६ जुलै, २०११

आज काही सुचले नाही
आज काही घडले नाही
फक्त तुझ्या आठवणी शिवाय
हृदयात काहीच उरले नाही. : अस्मित

मीरेचे 'मी' पण तिच्या कृष्ण होण्यात आहे
राधेच तिच्या कृष्णा सोबत असण्यात आहे - अस्मित
अबोल झाले ओठ जरी भावना अबोल राहत नाहीत
फक्ता एक इशारा, दुसर काही मागत नाही...asmit

गुरुवार, २१ जुलै, २०११

परत आलीये....!!!!


काही दिवसापासून सुरू असलेले मेंदूतील वादळ आज अचानकपणे शांत झाल.....

काय चालू होत,कसले एवढे विचार आणि त्यांचा त्रास काहीच समजत किंवा उमजत नव्ह्त...

घंटानाद झाल्यावर चहूकडे जसे तरंग विलोप पावतात आणि शांतता पसरते तसच झालय किंवा मलाच मी नक्की सापडलिये...

हूं...!!! तसच आहे...मला काय हव होत तेच मिळालय...

म्हणूनच हे समाधान अगदी हृदयापासून चेहर्‍या पर्यंत......

मी परत आलीये....!!!!

पूर्वीची नक्कीच नाही...नवीन जाणीव, नवी उमेद, नवी स्वप्न घेऊन....

पूर्ण होण्यासाठी....तुझ्यासाठी....तुझ्याकडेच!!!!!!



मंगळवार, १९ जुलै, २०११


कधीतरी स्वत:ला या गर्दीतून बाजूला करून त्रयस्थपणे बघाव..

माणसांच्या चेहर्‍यावरील ते निरनिराळे भाव; काळजीचे, त्रासाचे, प्रेमाचे, रागाचे, बेफिकीरीचे....

प्रत्येक क्षणाला बदलत जाणारे..नवीन अर्थ सांगणारे....

असंख्य माणसांची असंख्य भावविश्वे...

ते घट्ट धरून ठेवलेले हात आणि ती तुटू पाहणारी नाती...

क्षणाक्षणाला बदलणारी माणसे, का सजीव झालेले मुखवटे.....

काहीच कळेणास होत आणि आपलाच चेहरा धूसर होऊन जातो...

शेवटी उरत एक शरीर त्या गर्दीपैकिच एक

त्याला फक्त एकच काम 'बदलत राहण'....अगदी कंटाळा आला तरी....

...............माझ्या कॉफीचा कप आता रिकामा होत चाललाय आणि सभोवतालची गर्दीपण आपापल्या घरी पोहोचलीये..........

शुक्रवार, १ जुलै, २०११

सप्तपदिची वचने फार प्रेमाने आणि जाणिवेने निभावलीस...
तसेच प्रेमही निभावले असतेस तर...?
कधीतरी या शापित नात्याला अंकुरले असतेस तर....?
कित्येक दिवस घालवले तुझी वाट पाहण्यात
कधीतरी जाणीव पूर्वकसाद घातली असतीस तर...?
नेहमीच असे का होते?
लोहचुंबाकाच्या दोन समान ध्रुवान प्रमाणे आपण वेगळेच राहतो..
आणि दूर गेलो की कोणीतरी एक परत जवळ आकर्षून घेतो......
पण राधा कधी कृष्ण होत नाही.........
आणि मी नेहमी मीरेची जबाबदारी पार पाडत राहते.........
बस्स झाले रे हे आता...!!!
एकदाच... अशी जवळ घे...
कळु देत सार्‍यांना...तुझ्यात आणि माझ्यातली
अद्वैतता...!!!
-अस्मित