माझी जपान सफर -८
या शनिवारी आम्ही फक्त दोघी मैत्रिणीच फिरायला गेलो.आदल्या दिवशीच सगळी माहिती गोळा करून कसे, कुठे,किती वाजता जायचे हे ठरवले.
जपानला आल्यापासून दर शनिवारी अथवा रविवारी नुसते भटकत होतो, त्यामुळे या वेळेस आरामात भटकंती करायची. स्वतःला अजिबात त्रास न करून घेता आणि घाई गडबडीने कुठेही जायचे नाही हे ठरवले होते.
या वेळची सफर साऱ्या जगाला "अजस्त्र बुद्धमूर्ती"चे शहर म्हणून ओळख असलेल्या "कामाकुरा" ला होती.
पसरट टुमदार छोटी छोटी घरं, घरांच्या आजूबाजूला विविध प्रकारची आणि व्यवस्थित राखलेली झाडे असलेलं "कामाकुरा" हे एक छोटस पण आकर्षक शहर. जपानच्या होन्शू प्रांतातील कानागावा जिल्ह्यात वसलेले कामाकुरा, टोकियो जवळच्या काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक. टोकियो पासून अंदाजे दक्षिणेकडे ५० कि.मी. अंतरावर असणार्या कामाकुराचे मुख्य आकर्षण म्हणजे कोतोकू-इन नावाची भव्य बुद्धमुर्ती. जपानच्या प्रसिद्ध सांस्कृतिक शहरात कामाकुराची गणना असून येथे केंचोजी, एन्याकुजी इ. देवतांची सु. शंभर देवालये आहेत.सुगीमोतोदेरा नावाचे शिंतो देवालय सुमारे १२०० वर्ष जुने आहे.याच ठिकाणी प्रसिध्द ५ भव्य झेन देवालये [कामाकुरा गोझान]आहेत.
मिनामोतोनो योरिमोतो नावाच्या एका सामुराई सेनापतीने जपान मध्ये सामुराई सरकार बनविण्याचा निर्णय घेतला आणि त्या सरकारचे मुख्य ठिकाण "कामाकुरा" निवडण्यात आले (३ हि बाजूला उंच डोंगर आणि एका दुसर्या बाजूला सागामी उपसागर असल्या कारणाने सुरक्षित म्हणून सन ११८०).या सामुराई सेनापतीने स्वतंत्र अशी "बाकुफू /शोगुनआते" नावाची राजकीय प्रणाली स्थापन केली.सुमारे ७०० वर्षांनतर हि सत्ता मेईजी काळात राजाकडे सोपविण्यात आली.
या शहराची लोकसंख्या सुमारे १७४,४१२ आहे. उत्तरेकडून पूर्वेकडे रोक्कोकुकेन(六国見147 m/482 ft), ओहिरा (大平山159 m/522 ft), जुबू (鷲峰山 127 m/417 ft), तेन्दाई (天台山141 m/463 ft), किनुबरी (衣張山 120 m/390 ft) अशा अनेक डोंगर दर्यांनी कामाकुरा वेढले गेले आहे.
आम्हाला आत्सुगी पासून कामाकुरा ला येण्यासाठी ४ ट्रेन बदलाव्या लागल्या. तिथे आम्ही साधारण दुपारी १:३० ला पोहोचलो. आधी काम केले ते पोटोबांना शांत करण्यासाठी म्हणून आम्ही "Mc D" मध्ये गेलो .मग चालत भटकण्याचे ठरवले.
सुरुवातीला कोतोकू-इन [बुद्ध मंदिर]ला गेलो.आत जायला २००येन आणि बुद्धमूर्ती आतून पाहायला २० येन चे तिकीट काढावे लागते. जपानी भाषेत इथल्या बुद्ध मुर्तीला 'दाइबुत्सु' (大仏 , daibutsu) म्हणतात. दाइ (大) म्हणजे मोठा / महान आणि बुत्सु (仏) म्हणजे बुद्ध. एकूणच 'महान बुद्ध'. या मुर्तीकडे पाहून लक्षात येतेच. सामुराई सेनापती मिनामोतोनो योरिमोटो ची इच्छा म्हणून हि मूर्ती बनविण्यात आली. कोर्ट लेडी इनादा आणि धर्मगुरु जोको यांनी या साठी पैसे गोळा करणे, जागा शोधणे असे परिश्रम घेतले. धर्मगुरूंच्या मते पवित्र भूमीचा /त्रीलोकाचा देवता पश्चिमेकडे वसतो आणि त्यांच्या मान्यते नुसार पश्चिम कामाकुरा मध्ये या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १२४३ मध्ये हा पुतळा पहिल्यांदा बनविण्यात आला. सुरुवातीला लाकडी मूर्ती, तेही २४ मी. उंच अशी होती. परंतु १२४७ च्या वादळात हि मूर्ती पूर्ण कोलमडून पडली. त्यानंतर ५ वर्षांनी म्हणजे १२५२ मध्ये १३.३५ मीटर उंच आणि १२१ टन वजन असलेली ब्राँझची मूर्ती बनवायला प्रारंभ झाला.हि मूर्ती १२६२ मध्ये पूर्ण बनवून झाली.त्या मूर्ती भोवती ४० मी उंच लाकडी देऊळ होते. परंतु तेही १२३५ च्या वादळाने उद्वस्त झाले.त्यानंतर १४९८ च्या भूकंप आणि त्सुनामी वादळाने नवीन बांधलेली इमारत कोसळून गेली, परंतु मूर्ती ला काहीही झाले नाही, हे आश्चर्य...त्यानंतर देऊळ बांधायला कोणीही मदत केली नाही आणि तेव्हा पासून हि मूर्ती अशीच वादळवाऱ्यात उघड्यावर आहे गेली ७०० वर्ष....
या मुतीच्या मागे ४ कमळाच्या पाकळ्या आहेत, त्यावर देणगीदारांची नावे कोरलेली आहेत.बुद्धाच्या पाठीवर २ खिडक्या आहेत. मूर्तीसमोर उदबत्ती लावायला मोठ्ठ उदबत्ती घर आहे. काही लोक इथे मोठ्या भक्ती भावाने पूजा करताना, हात जोडताना दिसतात. परंतु बरेचसे लोक हे देऊळ नसून टूरिस्ट प्लेस असल्यासारखे वागतात. बुद्धाच्या मूर्तीसमोर कसेही फोटो काढताना दिसतात.एक देव म्हणून मूर्तीकडे पाहणारे लोक कमीच आढळतात.
जपानी लोक पण बरेचसे [अंध] श्रद्धाळू आहेत. येथील दुकानातून लकी बेल, लकी स्टोन असे बरेच काही विकायला असलेले दिसते.ते आपल्या जवळ ठेवल्याने निरोगी आरोग्य, पैसा, शांती मिळते असे मानतात. येथे एक मातीची घंटी पाहायला मिळाली. ती घंटी सतत जवळ बाळगल्याने आपल्यावर येणारे संकट त्या घंटीवर जाते आणि त्यामुळे ती घंटी फुटते असे मानतात.परंतु घंटी कुठेतरी आपटून फुटली का संकटाने फोडली? कसे कळणार???? [हा माझा बाळबोध प्रश्न. कारण जर का ती घंटी घेऊन मी भारतात आले असते आणि मध्ये प्रवासात फुटली असती तर????? माझ्या प्रवासात संकट होते असे मी मानायचे?????]
मूर्तीच्या आत जायला खूपच छोटा जिना आहे. आणि तेथे थोडा काळोख पण होता. आत गेल्यावर हात लावले कि मूर्ती किती जाड आणि जड आहे ते जाणवते. आतील भागात मूर्तीच्या आर्किटेक्चर बद्दल माहिती दिलेली आहे. जॉइंट्स कुठे कसे आहेत ते नीट ड्रॉ करून दाखवले आहे. तेथे आर्किटेक्चर शिकणारे विद्यार्थी पण मूर्तीचा अभ्यास करायला आले होते.
बाहेर पडल्यावर पुढे आम्ही "कैकोझान जीशो-इन हासे-डेरा" हे बुद्ध मंदिर पाहायला गेलो.हे मंदिर तोकुदो नावाच्या धर्मगुरूने सुमारे ७२१ ए.डी. च्या काळात बांधले आहे.एकदा जंगलात या धर्मगुरूला कापराचे मोठ्ठे झाड दिसले आणि ते पाहून "झाडाचे खोड एवढे मोठे आहे कि ११ डोकी असलेले २ पुतळे यातून बनविता येतील" असा विचार त्याला आला.या झाडापासून बनविलेला १ पुतळा नारा मधील देवळात आहे आणि २रा पुतळा जो दोन्ही मध्ये मोठा होता, तो समुद्रात टाकून दिला आणि प्रार्थना केली कि हा पुतळा जेथे जाईल तेथे तो लोकांचे रक्षण करो. १५ वर्षांनी हा पुतळा १८ जून ७३६ मध्ये "नागाई" समुद्र किनारी दिसून आला. तो पुतळा कामाकुरा ला आणून मग त्याचे देऊळ बांधण्यात आले.
या देवळाचा परिसर ४०,००० स्क़्वे.मी. असा आहे.कर्नाटकातील "कोटी लिंगेश्वरा" येथे जशी खूप सारी शिवलिंग आहेत तसे येथे मंदिराच्या भोवताली खूप सार्या मूर्ती ठेवलेल्या आहेत (त्यांचे खरे कारण नंतर समजले). काही मूर्तीवर वाहत्या पाण्याने अभिषेक केला जातो. त्यासाठी जवळच एक ओरगले ठेवलेले असते. त्या ओर्गाल्याने पाणी मूर्तीच्या डोक्यावर, दोन्ही खांद्यांवर टाकले जाते.येथे उदबत्ती,मेणबत्ती आणि फुलांचे गुच्छ विकायला ठेवलेले असतात. आपले आपण ते पैसे देऊन घ्यायचे. कोणी विक्रेता नाही,आरडा ओरड नाही कि फसवणूक नाही.
देवळाजवळ एक खूप मोठी घंटा आहे[१६७.६ से.मी उंच आणि १२६४ मध्ये तयार केली.] ती वाजवण्यासाठी एक लाकडी ओंडका लटकावलेला असतो. आपल्यासारख घंटेला आतून ओंडका नसून, तो बाहेरून घंटेवर मारायचा असतो. या मंदिरातील बुद्ध मूर्ती अतिशय सुंदर,रेखीव आहे. ११ डोकी (संस्कृत मध्ये एकादशमुख) असलेला "कान्झेओन" देव पाहून डोळ्याचे पारणे फिटते.९.१८ मी उंच कापराच्या लाकडाची मूर्ती आणि तिला सोनेरी रंग देण्यात आला आहे. पाहून असे वाटते कि मूर्ती धातूची असावी. ४ मुख्य डोकी आणि बाकी डोकी या ४ डोक्यांच्या वर आहेत.सर्वात मागचा चेहरा हसतानाचा आहे असे मानतात [आणि बुद्ध हसला....]
पुढे कानोन देवीच्या ३३ वेगवेगळे भाव असलेल्या मूर्ती आहेत. असे मानले जाते कि हि देवी ३३ वेगळ्या भावात स्वतःला प्रकट करू शकते आणि ती दुखी कष्टी लोकांचे रक्षण करते.या मूर्ती जवळपास १ मी उंचीच्या आहेत. सर्वात जुनी मूर्ती १५४३ मधील आहे.
येथे एक "क्योझो / सूत्र भांडार" आहे. बुद्धाची सूत्रे अगदी महायाना सहित सगळी, येथे एका फिरत्या कपाटा मध्ये जतन करून ठेवली आहेत.महायान बुद्धिझम ("इस्साइक्यो") चे १०० भाग आहेत आणि प्रत्येक भाग ९०० पानांचा आहे.सर्व माहिती चायनीज भाषेत आहे. (या पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले आहे, त्यासाठी १७ वर्षे लागली). जर तुम्ही ते पुस्तकांचे कपाट एकदा फिरवले तर तुम्हाला ती सगळी पुस्तके वाचण्याचे पुण्य मिळते असते मानतात (शोर्ट कट... :) )
या मंदिराच्या आजूबाजूला काही पुतळे आपल्याकडील देवीसारखे वेगवेगळ्या रुपात दिसतात. कोणी पायाखाली असुर मारतंय, कोणी तलवार उपसली आहे असे.
मंदिराच्या मागे डोंगरावर जायला जिना आहे. तेथून मंदिराचा रम्य परिसर आणि दूरवरचा समुद्र किनारा दिसतो.
मंदिराच्या उत्तरेकडे गुहेत दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. आपण साधारण २ इंच उंचीच्या मूर्ती आप्तेष्टांच्या नावाने येथे अर्पण शकतो. या मूर्तीची किंमत साधारण ५०० येन आहे.
येथे जवळच "एननोजी" नावाचे मंदिर आहे. या मंदिरात इंग्रजी "U" आकारात वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. असे मानले जाते कि माणूस मेल्यावर स्वर्गात जाणार कि नरकात हे ठरवण्यासाठी या १० मुर्तींसमोर (१० राजे) जावे लागते. त्या मूर्ती त्या माणसाचे सगळे आयुष्य तपासून मग निर्णय घेतात.
जपानमध्ये "मिझुको" चा धंदा खूप जोरात चालतो. १९९९ पर्यंत येथे गर्भनिरोधक गोळ्यांना मान्यता नव्हती, त्यामुळे नको असलेले गर्भ पाडून त्यांच्या नावाने येथे "जीझो" ची मूर्ती वाहिली जायची.काही देवळे यामधून खूप पैसे कमावतात.
मंदिर पाहून आम्ही पुढे समुद्र किनारी गेलो , परंतु खूप जोराचा वारा आणि थंडी मुळे आम्हाला लगेच माघारी परतीचा प्रवास स्वीकारला.
.......................... ...................अस्मित [३१ ऑक्टो २०१२ जपान]

..........................